VARYACHYA WATENE Lyrics
- Genre:Pop
- Year of Release:2022
Lyrics
वाऱ्याच्या वाटेने...
हा रस्ता जाऊ दे...
मिंटांच्या (मिनिटांच्या) काट्याला...
आहिस्ता धावू दे...
माझी तुझी आपली ही घडी...
ओघांमध्ये वाहू दे...
एकांत दोघातला हा जरी...
दोघांमध्ये राहू दे...
वाऱ्याच्या वाटेने...
हा रस्ता जाऊ दे...
मिंटांच्या (मिनिटांच्या) काट्याला...
आहिस्ता धावू दे...
संपू नये
असा खेळ हा
पडतो तरीही मनाला तिढा...
वाळू जशी
तसा वेळ हा
येतो न हाती हवा तेवढा...
डोकावत्या चांदव्याला नभी...
मेघांमध्ये राहू दे...
एकांत दोघातला हा जरी...
दोघांमध्ये राहू दे...
वाऱ्याच्या वाटेने...
हा रस्ता जाऊ दे...
मिंटांच्या (मिनिटांच्या) काट्याला...
आहिस्ता धावू दे...
चालायचे
होते खरे
तरी पावलांनी मला रोखले
बोलायचे
होते खरे
तरी का मनाने मला टोकले
लाटा तुझ्या ह्या किनाऱ्यावरी
रेघांमध्ये राहू दे...
एकांत दोघातला हा जरी...
दोघांमध्ये राहू दे...
वाऱ्याच्या वाटेने...
हा रस्ता जाऊ दे...
मिंटांच्या काट्याला...
आहिस्ता धावू दे...