YA HO SHIVARAYA ft. ANAND SHINDE, UTKARSH SHINDE & ADARSH SHINDE Lyrics
- Genre:Folk
- Year of Release:2023
Lyrics
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती शिवाजी महाराज की जय!!
गडकिल्ल्यांच्या बुरूजावरती फडफडला भगवा
तीन शेकडा वर्षांनतर गुरगुरला छावा
म्यान फाडुनी सळसळल्या तेव्हा समशेरी
जेव्हा सह्यगिरीचे कडे फोडुनी रसरसला लाव्हा
मंदिरी भग्न भगवंत
अबला करती आकांत
अन् धर्मरक्षणा वणवण फिरती सज्जन साधू संत
ललकारी हर हर महादेव अस्मानी घुमवाया
मातीचे मोल जपाया
या हो या हो शिवराया
सन्मान पुन्हा मिळवाया
या हो या हो शिवराया
अन् युगे युगे जन्माया
या हो या हो शिवराया
मर्दानी मावळ्यांचे धमन्यात रक्त वाहू दे
अन्यायी दुश्मनांचे सख्त तख्त फोडू दे
अंधार हा जाळण्याला स्वातंत्र्यसूर्य होऊनी
संस्कार जिजाऊंचे अन् पाठीशी माय भवानी
तुमचे गुणगान गायला आतूर ही शाहिरी भाषा
ढम ढम झडतात नौबती वाजे तुतारी तडके ताशा
ही शेर दिलांची छाती
घेऊन फौज मरहट्टी
आरपार कराया वार कोसळे वीज जशी कडकडती
झालो सारे तैय्यार आज ही मोहिम जिंकाया
मातीचे मोल जपाया
या हो या हो शिवराया
सन्मान पुन्हा मिळवाया
या हो या हो शिवराया
अन् युगे युगे जन्माया
या हो या हो शिवराया